मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे वितरण कार्यक्रमात उष्माघाताचे बळी ठरलेल्या नागरिकांची आज दवाखान्यात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी भेट घेऊन त्यांच्या उपचारांबद्दल रुग्णालय प्रशासनाशी चर्चा केली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यासह सहकारी उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा कार्यक्रम नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर पार पडला. या कार्यक्रमानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला असून १० जणांवर मृत्यू ओढवला आहे. भव्यदिव्य कार्यक्रम भर उन्हात घेतल्याने काहींची प्रकृती चिंताजनक आहे. उष्माघाताचा त्रास होऊ लागताच अनेकांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मैदान खचाखच भरले होते. श्री सदस्य (धर्माधिकारी यांची संस्था) यांच्या अनुयायांना कोणतीही सोय करण्यात आली नव्हती. त्यामुळे ते भर उन्हात कार्यक्रम पाहत होते. त्यांना शेडची सुद्धा व्यवस्था करण्यात आली नव्हती. उन्हाळ्याची तीव्रता मोठी असल्यामुळे नागरिकांना याचा परिणाम भोगावा लागला


