ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख जल संघर्ष यात्रा घेऊन नागपूरच्या सीमेवर दाखल झाले आहेत. मात्र पोलिसांनी त्यांची संघर्ष यात्रा मध्येच अडवली आहे. आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील खारपाणपट्यातील गावांसाठी वरदान ठरणाऱ्या 69 गाव प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनेला सरकारने स्थगिती दिल्याच्या विरोधात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष यात्रेला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, त्यांची ही यात्रा नागपुर येथे थांबवण्यात आली. नितीन देशमुख जल संघर्ष यात्रा घेऊन नागपूरच्या सीमेवर दाखल झाले आहेत.
मात्र पोलिसांनी त्यांची संघर्ष यात्रा मध्येच अडवली आहे. आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. दत्तवाडी परिसरात मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले होते. राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्याही बोलावण्यात आल्या होत्या.



