परदेशात शिक्षण घेत असलेल्या काही विद्यार्थ्यांना एटीकेटी गुण मिळल्याने ‘राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा’ लाभ थांबवण्यात आला होता. याची माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. याला आता राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना पुन्हा बहाल केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती’ही योजना राबविण्यात येते. यामध्ये परदेशातील विद्यार्थ्यांची शिक्षण पूर्ण फी, आरोग्य विमा व व्हिसा शुल्क मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. परंतु, अनेकदा नवे वातावरण व अन्य काही कारणांमुळे मुलांना एटीकेटी गुण मिळतात. यानंतर त्यांची शिष्यवृत्ती थांबवण्यात येते.



