लोणावळा -मावळ तालुक्यातील देवले ग्रामपंचातीचे प्रथम लोकनियुक्त माजी सरपंच महेंद्र लक्ष्मण आंबेकर यांना स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांंच्या वतिने अहमदनगर येथे राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना राज्यातील आदर्श गाव व आदर्श सरपंच भास्कराव पेरे पाटील ,संघटनेचे संस्थापक बाबासाहेब पावसे,संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रोहित पवार,राज्य संपर्क प्रमुख अमोल शेवाळे,विश्वस्त सुजाता कासार यांंच्या प्रमुख उपस्थीतीत पुरस्कार देण्यात आला.
महेंद्र आंबेकर यांनी आपल्या सरपंच कार्यकालात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या विविध विकासकामांची पोचपावती म्हणून त्यांना हा आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल आंबेकर यांचे मावळ तालुक्यातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



