पिंपरी : महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक संपन्न झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले अकादमी एसपीए करिता निवड झालेल्या विद्यार्थी प्रशिक्षणार्थी यांना द्यावयाची दरमहा विद्यावेतनची रक्कम अटी व शर्ती निश्चित करून देणेस व त्याकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
सन २०२३- २४ या शैक्षणिक वर्षाकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या इयत्ता बालवाडी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, पी.टी. गणवेश आणि स्वेटर खरेदी करणे कामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
सेक्टर २३ निगडी शुद्धीकरण केंद्र खाजगीकरणाने चालवणे या कामाअंतर्गत टप्पा क्रमांक १ ते ४ व केमिकल हाऊस खाजगीकरणाने चालवण्यास मान्यता देण्यात आली.
मनपाचे ब कार्यक्षेत्रातील महिला बचत गट, महिला मंडळांना प्रभागनिहाय सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता व देखभाल दुरुस्तीची कामे देण्यास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्रमांक १८ मधील केशवनगर, चिंचवडगाव व इतर परिसरातील रस्ते व इतर रस्ते आवश्यकतेनुसार दुरुस्ती करण्यास मान्यता देण्यात आली.
२०२३-२०२४ या सालाकरिता मनपा कडील ड गटातील वाहनांच्या व मनपा वाहनांवरील हायड्रोलिक यंत्रणेची दुरुस्ती करणेकामी एजन्सी निश्चित करण्यास मान्यता देण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका पीजीआय यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय अंतर्गत मासुळकर कॉलनी येथील नेत्र रुग्णांलायच्या दैनंदिन साफसफाईसाठी अकुशल संवर्गातील कर्मचारी नियुक्त करण्यास मान्यता देण्यात आली.
मनपा चे ग क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक २४ व २७, प्रभाग क्रमांक २ व ८ तसेच तळवडे गायरान येथील विविध उद्याने देखभाल करणेबाबत मान्यता देण्यात आली.




