चऱ्होली : नुकताच मंथन प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून रामचंद्र गायकवाड माध्यमिक विद्यालयातील इयत्ता सहावी व सातवी वर्गातील विद्यार्थ्यांनी केंद्रस्तरीय यादीत स्थान मिळवून विद्यालयाची यशाची परंपरा कायम राखली आहे.
सहावी कक्षेतील तन्मय पाटील हा केंद्रात दुसरा तर ओमकार जानापुरे तिसरा, सातवी कक्षेतील वरद पोतदार केंद्रात पहिला तर सोहम राऊत दुसरा येत हे विद्यार्थी केंद्रस्तरीय गुणवत्ता यादीत झळकले आहेत. विद्यालयाची गुणवत्ता यादीत येण्याची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम ठेवली. याकरिता बाह्य परीक्षा विभागप्रमुख म्हणुन पाडुरंग गावडे, मंथन प्रमुख म्हणून स्मिता भोसले यांनी कामकाज पाहिले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
या यशामुळे वेळोवेळी मार्गदर्शन करणारे संस्थेचे पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद वाळके ,संस्थेचे संस्थापक ह.भ.प दत्तात्रय गायकवाड, रवींद्र गायकवाड, अध्यक्ष विनायक वाळके, युवा नेते उदय गायकवाड, पर्यवेक्षिका मंगल भोसले यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकाचे अभिनंदन करत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




