तळेगाव दाभाडे: अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आणि पुणे जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने तळेगाव दाभाडे येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय रायन फुटबॉल जिल्हास्तरीय लीग स्पर्धेतील सहा पैकी तीन गटात विजेतेपद मिळवत तळेगाव दाभाडे येथील माउंट सेंट अॅन्स स्कुलने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. १४ वर्षे मुलांच्या वयोगटात शांक मायटी तर मुलींच्या याच वयोगटातील आंचल मोरे यांनी बेस्ट प्लेअर्सचा किताब मिळवला.
नूतन इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर पार पडलेल्या स्पर्धेत २३ शालेय संघांच्या २५३ खेळाडूंनी भाग घेतला. ब्लुमिंग इंटरनॅशनल स्कुलचे विश्वस्त साहेबराव बोडके आणि रायन स्पोर्ट्स अकॅडमीच्या सचिव मार्गारेट स्वामी यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आली. राष्ट्रीय फुटबॉल पटू मनोज स्वामी, विजयकुमार चिन्नया, अलिवन मकासरे, शाबीर सय्यद, वैभव मालुसरे, घनश्याम राणा, सिद्धार्थ शिंदे आणि लान मार्टिन यांनी पंच म्हणून काम केले. यावेळी पंचांचा सत्कार करण्यात आला.
स्पर्धेचा निकाल याप्रमाणे:-
(गट अ १४ वर्षे मुले):- विजेता संघ- पोदार इंटरनॅशनल स्कूल वडगाव मावळ; उपविजेते माउंट सेंट अॅन्स स्कूल तळेगाव दाभाडे
(गट अ १४ वर्षे मुली):- विजेता संघ- ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल गहुंजे; उपविजेते- माउंट सेंट अॅन्स स्कूल तळेगाव दाभाडे
(गट ब: १२ वर्षे वयोगट मुले):- विजेता संघ- माउंट सेंट अॅन्स स्कूल तळेगाव दाभाडे
उपविजेते- पोदार इंटरनॅशनल स्कूल वडगाव मावळ
(गट क १० वर्षे वयोगट मुले):- विजेते माउंट सेंट अॅन्स स्कूल तळेगाव दाभाडे; उपविजेते ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल गहुंजे
(गट ड ८ वर्षे वयोगट मुले):- विजेते माउंट सेंट अॅन्स स्कूल तळेगाव दाभाडे; उपविजेते ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल गहुंजे
(गट इ ६ वर्षे वयोगट मुले):- पोदार इंटरनॅशनल स्कूल तळेगाव दाभाडे; उपविजेते ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल गहुंजे



