शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले गेले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार अजित पवार यांच्याबरोबर भाजपात जाणार असल्यानेच शरद पवारांनी हा राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचाही दावा केला जात होता. मात्र, आता शरद पवारांनी कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आग्रहानंतर राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला. यानंतर शुक्रवारी (५ मे) पत्रकारांनी अनेक आमदार एका मोठ्या नेत्याबरोबर दुसऱ्या पक्षात जाणार होते म्हणून राजीनामा दिला का? असा थेट प्रश्न विचारला. यावर शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
शरद पवार म्हणाले, “कोणताही पक्ष असू द्या, जर कुणाला पक्ष सोडून जायचं असेल, तर त्यांना कुणीही अडवत नाही. त्यासाठी पक्षाच्या नेत्याने स्वतः नरमाईची भूमिका घेण्याची गरज नाही. अशावेळी नेत्याने पुढे येऊन या परिस्थितीत बदल कसा घडू शकतो यावर लक्ष दिलं पाहिजे. इतकं तर मला कळतं. मात्र, अशी स्थिती आमच्या पक्षात नाही.



