पिंपरी: एकीकडे राज्यातील राज्य सरकारच्या डोक्यावरती सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे लक्ष लागून लागणे आहे असे असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र महापालिका निवडणुका पावसाळ्यानंतर ऑक्टोंबर मध्ये लागतील अशा सूचना करत कार्यकर्त्यांना कामाला लागा अशा सूचना बावनकुळे यांनी पिंपरी चिंचवड मध्ये झालेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना केले आहेत.
निगडी प्राधिकरणात महाराष्ट्रातील पहिल्या ” युवा वॉरियर्स ” च्या डिझिटल शाखांचे उद्घाटन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
बावनकुळे म्हणाले, महापालिका निवडणुका घेण्यासाठी आता पुरेसा वेळ नाही. पावसाळ्यात निवडणुका घेता येणे शक्य नाही. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये निवडणुका होतील. निवडणुकांमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवारांची अनामत रक्कम जमा होईल, अशा पद्धतीने तयारी करायची आहे. त्यासाठी प्रत्येक घरापर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचले पाहिजे.
महापालिका निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. मात्र, त्यासाठी पक्षाचे सरल अॅप घरोघरी पोहोचले पाहिजे. किती जणांनी किती जणांपर्यंत अॅप पोहोचवले आहे याची पाहणी मी स्वतः करणार आहे. त्यावरून महापालिकेत कोणाला तिकीट द्यायचे याचा निर्णय महेश लांडगे नव्हे तर मी घेणार आहे, अशी तंबी बावनकुळे यांनी महापालिका निवडणुकीसाठी पक्षाच्या इच्छुकांना दिली.




