
‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट केरळ राज्याविरोधातील प्रोपगंडा असल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं. चित्रपट निर्मात्याला फासावर लटकावलं पाहिजे, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यात काहीही बेकायदेशीर आढळलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा थेट इशारा फडणवीसांनी दिला. ते अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.



