देहुरोड ( ता.हवेली ) येथील श्री.शिवाजी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच पार पडला.सन २०००-०१ या वर्षी इ.दहावीच्या वर्गात शिक्षण घेतलेले १३५ विद्यार्थी एकत्र आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मा.उपसचिव मा.प्राचार्य जे.एम.डुंबरे होते.यावेळी माजी प्राचार्य आर.व्ही.शिंदे,एन.बी.मानकर,व्ही .ए.पानसरे,एन.पी.बोराटे,ए.ई.भो सले,डी.वाय.साळुंखे,बी.एन.शितो ळे,बी.ई.शेंडे,आर.एन.पंडित,मा. उपप्राचार्य एस.एम.जहागीरदार,पी.व्ही. गाणबोटे,प्राचार्य आर.एन.सानप तसेच तत्कालीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व सरस्वती पुजनाने झाली.माजी विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख करुन देत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.सर्व शिक्षकांचा बनगरवाडी हे पुस्तक व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी पुनम सोनवणे,अशिता नाईक,शंकर झोंबाडे,प्रज्ञा माळी व मेघा सांडभोर या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.मा.प्राचार्य बी.एन.शितोळे,माजी ग्रंथपाल जे.व्ही.जोशी,मुख्याध्यापिका आर.बी.गायकवाड,प्राचार्य आर.एन.सानप यांनी मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेला १० ग्रीन बोर्ड सुपूर्त करत कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन छाया शेंडकर,पल्लवी पवार यांनी तर प्रास्ताविक संगिता कांबळे यांनी केले.अंकुश गायकवाड यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे संयोजन गोपाळ शेलार,विजेंद्र राऊत,राहूल ढगे,उमेश भेगडे,विकास धुमाळ,विशाल भोसले,नवनाथ राऊत,आनंद तरस यांनी केले.यावेळी निलेश मानकर यांनी विशेष सहकार्य केले.परिपाठ,कवायत,सेल्फी पाँईंट,वर्गसंवाद,मनोरंजक खेळ,जेवणाची सुट्टी या उपक्रमातून माजी विद्यार्थी पुन्हा विद्यार्थी होऊन शाळेत हरवून गेले होते.




