पवनानगर : पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेच्या वतीने आज पाणी बंद आंदोलन करण्यात आले. मावळ तालुक्यातील पवना धरणग्रस्तांनी मोर्चा काढला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासह अनेक मागण्या प्रलंबित आहेत. पवनानगर बाजारापेठेतून मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकरांना अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला तेव्हा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करू नका. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हा मोर्चा त्यामुळे शेतकऱ्यांची अडवणूक करू नका, असे म्हणत मोर्चा पवना डॅमच्या गेटमधून आत नेला. मोर्चेकऱ्यांनी पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा बंद केल्याचे सांगण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणावर आज धरणग्रस्तांनी तीव्र मोर्चा काढला. या मोर्चात मावळचे आमदार सुनील शेळके आणि धरणग्रस्त शेतकरी सहभागी झाले. पवनानगर बाजारपेठेतून घोषणाबाजी करत मोर्चा पवना धरणावर पोहोचला. मोर्चाची कल्पना असल्याने पिंपरी- चिंचवड, लोणावळा ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. मोर्चासह पोलीस चालत होते.

पवना धरणावर मोर्चा जाताच पोलिसांनी मोर्चेकरांना अडवण्याचा प्रयत्न केला. “आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करू नका, शेतकऱ्यांना अडवू नका, आम्हाला गोळ्या घाला असे आमदार सुनील शेळके यांनी म्हणत पोलिसांचा विरोध झुगारून पवना धरण परिसरात मोर्चेकऱ्यांना पुढे घेऊन गेले. गेल्या अनेक वर्षांपासून पवना धरणग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित आहेत. ८ मे १९७३ आदेशानुसार ज्या पध्दतीने ३४३ खातेदारांचे पुर्नवसन केले आहे त्याप्रमाणे उर्वरित खातेदारांचे चार एकर जमीन आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नोकरी मिळावी, अशा विविध मागण्या घेऊन धरणग्रस्तांनी मोर्चा काढला आहे. या मोर्चाकडे आणि मागण्यांकडे राज्यसरकार कसे पहाते हे बघावे लागेल.
पवनाधरणग्रस्त संयुक्त संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांनी आज दि.९ रोजी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा बंद केला असून आम्हाला जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत पवनाधरणाचे पाणी पिंपरी चिंचवड शहराला पाणी करुन देणार नाही अशी ठोस भूमिका घेतली असुन पवनाधरण पाणी पुरवठा करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयातुन बाहेर काढून कार्यालय बंद केले आहे.
यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके, भाजपाचे तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव शेलार,काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ,माजी ज्ञानेश्वर दळवी,गणेश धानिवले, रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव,पवना संयुक्त संघटनेचे अध्यक्ष नारायण बोडके,रविकांत रसाळ, मुकुदराज काऊर,किसन घरदाळे, बाळासाहेब मोहोळ, दत्तात्रय ठाकर,राम कालेकर यांच्या सह मोठ्या प्रमाणावर आंदोलक असून यावेळी आंदोलन घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मावळ चे तहसीलदार विक्रम देशमुख, खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, उपभियंता अशोक शेटे,पवना अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुजितकुमार राजगिरे शासनाच्या वतीने आंदोलन स्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारले.
- धरणग्रस्तांशी चंद्रकांत पाटील यांनी फोन व्दारे साधला संवाद
धरणग्रस्तांशी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फोनद्वारे साधला संवाद, १९ मे ला बैठक बोलावून तोडगा काढण्याचे दिले आश्वासन दिले असून सध्या सुरू असलेले आंदोलन स्थगित करावे असे आवाहनही पाटील यांनी, आमदार सुनील शेळके यांनीदेखील धरणग्रस्तांची कैफियत मांडली
९मे १९७३ रोजी पवना धरणग्रस्तांना जमिन वाटप करण्यासाठी शासनाने आदेश काढला१२०३ खातेदारापैकी केवळ ३४० खातेदारांना या आदेशाप्रमाणे जमिन वाटप केले या आदेशाला ५० वर्ष पूर्ण झाली तरी धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच नाही
भाषण नको पुनर्वसन करा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी भाषण उपोषण मोर्चे बंद करा अंतिम निर्णय होईपर्यंत माघार घेऊ नका अशी आक्रमकपणे भुमिका आमदार सुनील शेळके यांनी केले आंदोलनस्थळी सुरू असलेली भाषणे बंद करत आंदोलकांनी धरणाच्या गेटवर जाऊन घोषणाबाजी केली




