मुंबई-कर्नाटक रिजनमध्ये ५० जागा असून यामध्ये पक्षनिहाय वोट शेअर कसं असेल? याची माहिती देण्यात आली आहे. इंडिया टुडे-अॅक्सि माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला ४२ टक्के, काँग्रेसला ४५ टक्के, जेडीएसला ८ टक्के तर इतर पक्षांना मिळून ५ टक्के मतं मिळू शकतात. तर जागांबाबत भाजपला २१, काँग्रेसला २८, जेडीएसला १ आणि इतर पक्षांना ० जागा मिळतील असा अंदाज एक्झिट पोल्समधून वर्तवण्यात आला आहे.त्यामुळं यामध्ये काँग्रेसच आघाडीवर राहिलं असं चित्र आहे. त्यामुळं राज्यातही काँग्रेस आघाडीवर असेल तर मराठी बहुल भागातही काँग्रेसच आघाडीवर असेल असा कल आहे.
मुंबई-कर्नाटक रिजन काय आहे?कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री जेसी मधुस्वामी यांनी सांगितलं होतं की, केंद्रीय मंत्रीमंडळानं कर्नाटकातील मराठी बहुल भाग अर्थात मुंबई-कर्नाटक रिजन निश्चित केला आहे. या रिजनमध्ये उत्तर कन्नड, बेळगाव, धारवाड, विजयपुरा, बागलकोट, गदग आणि हवेरी (कित्तूर कर्नाटक) या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे.



