पिंपरी : मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर पश्चिम महाराष्ट्रातील कामगारांच्या समस्यासाठी पिंपरी चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते सातारा जिल्हा मित्र मंडळ सदस्य, यशवंतराव चव्हाण स्मारक समिती सदस्य प्रकाश यादव यांनी शिव छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज खासदार छत्रपती श्री. उदयराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली.
प्रकाश यादव हे पिंपरी -चिंचवड येथे नोकरी व्यवसाय निमित्ताने वास्तवास स्थलांतरीत झाले. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर असे पश्चिम महाराष्ट्र मधील नागरिकांच्या तसेच कामगारांच्या अडी – अडचणी सोडविण्या संदर्भात राज्यसभेचे (मेम्बर ऑफ पार्लमेंट) खासदार छत्रपती श्री उदयनराजे भोसले यांची सातारा येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते कृषि पदवीधर शहाजी पिसाळ (देशमुख), जितेंद्र यादव, स्वप्नील जाधव, दत्ताभाऊ देशमुख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग येथे कार्यरत असणाऱ्या सम्पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील कामगारांच्या संदर्भात त्यांना होत असलेला त्रास आणि त्यांच्या अडचणी सोडविण्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. आपण यामध्येे आवर्जून लक्ष ठेवून राहणार असल्याबद्दल आवर्जून बोलून दाखवले. उर्से, लोणावळा , खोपोली , पनवेल येथील कामगारांच्याा भेटी घेऊन समस्या जाणून घेणार आहे. तसेच महाराजांनी शंभर टक्के मदत करण्याचे आश्वासन दिले.




