नवी दिल्ली : भारतीय शाळा प्रमाणपत्र परीक्षा परिषद (CISCE) आज (13 मे) ICSE इयत्ता 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर करणार आहे. हा निकाल आज दुपारी 3 वाजता अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला जाईल.
दरम्यान विद्यार्थ्यांना त्यांचे ISCE result 2023 तपासण्यासाठी त्यांचा इंडेक्स क्रमांक आणि दिलेल्या कॅप्चा कोडसह UID भरणे आवश्यक आहे. विद्यार्थी त्यांचे मार्कशीट्स results.cisce.org (https://results.cisce.org/) या अधिकृत वेबसाइटवर तपासू शकतील
ICSE 10वीचा निकाल 2023 कसा तपासायचा:
अधिकृत वेबसाइटला भेट द्या
उजव्या वरच्या कोपर्यात ‘Results 2023’ वर
आता, ICSE Class 10 results 2023 विंडो उघडेल
इंडेक्स क्रमांक, UID आणि कॅप्चा कोड इंटर करा आणि ‘show result’ वर .
त्यानंतर, निकाल स्क्रीनवर दिसेल
तुम्ही या निकालाची प्रिंट काढू शकता
एसएमएसद्वारे निकाल (ICSE Results 2023) कसा पाहाल?
उमेदवार त्यांचा ICSE 10वी निकाल तपासण्यासाठी खाली दिलेल्या फॉरमॅटनुसार एसएमएसद्वारे त्यांचा ICSE निकाल 2023 पाहू शकतात.
SMS फॉरमॅट : ICSE निकालासाठी या क्रमांकावर एसएमएस पाठवा: 09248082883.
SMS उदाहरण: ICSE 1786257
या फॉरमॅटमध्ये एसएमएस पाठवल्यानंतर, विद्यार्थ्यांना त्यांचा ICSE 2023 चा इयत्ता 10वीचा निकाल त्यांच्या मोबाईलवर पाहता येईल.
ICSE इयत्ता 10 वीच्या परीक्षा 27 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू झाल्या होत्या. तर परीक्षा 29 मार्च 2023 रोजी जीवशास्त्राच्या पेपरसह संपली. त्यानंतर विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहेत.
ऑनलाइन उपलब्ध असलेले ICSE Result 2023 हे तात्पुरते स्वरूपाचे आहेत याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांना ICSE मार्कशीटवर नमूद केलेले सर्व तपशील ऑनलाइन तपासण्याचा सल्ला दिला जातो. काही विसंगती किंवा त्रुटी आढळल्यास, त्ंयानी त्रुटी सुधारण्यासाठी बोर्ड अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.



