पिंपरी : पिंपरी-चिंचवड न्यायालयाचे मोरवाडी येथून नेहरूनगर येथील इमारतीमध्ये स्थलांतर करण्याचा अखेर मुहूर्त ठरला. बुधवारी (दि. 17) सकाळी साडेनऊ वाजता स्थलांतर समारंभ संपन्न होणार आहे. पिंपरी येथील पाच दिवाणी न्यायालयांचे स्थलांतर नेहरूनगर पिंपरी येथील नवीन इमारतीमध्ये होणार आहे. तसेच नेहरूनगर येथील नव्या इमारतीत आणखी सहा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालये मिळणार आहेत.
पुणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्याम चांडक, महापालिका आयुक्त शेखर सिंग, पिंपरी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आर एस वानखेडे, न्यायाधीश एन आर गजभिये, न्यायाधीश आर एम गिरी, न्यायाधीश एम जी मोरे, न्यायाधीश पी सी फटाले, न्यायाधीश एस पी कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार आहे.




