मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्य सरकारमधील सर्वच आमदारांना मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु असताना मंत्री पदासाठी पैसे मागितल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मंत्रिपदासाठी भाजपच्या तब्बल चार आमदारांकडे पैशाची मागणी केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
संबंधित भामट्याने फोन करून आमदारांना मंत्रीपद मिळेल असे सांगत कोट्यवधींची मागणी केल्याचे समोर आले. सदर भामट्याने आपण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचे स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून आमदारांना मंत्रिपद देतो असं सांगत पैशांची मागणी केली. भाजपशी या भामट्याचा काहीही संबंध नसून तो केवळ नड्डा याचे नाव वापरत होता. यानंतर भामट्याला पोलिसांनी अटक देखील केली आहे.



