देहूरोड (वार्ताहर ) मराठा आरक्षणासाठी शक्तीपीठ तुळजापूर ते मुंबई मंत्रालयाकडे पायी निघालेल्या वनवास यात्रेचे शनिवारी (ता. २७) देहूरोड शहरात आगमन झाले. देहूरोड मधील नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.
ज्येष्ठ नेते रमेश जाधव, धनंजय मोरे, दिलीप शिंदे, विलास हिनुकले, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब फाले, दिनेश राऊत, राहुल रायकर ,चंद्रकांत दाभोळे,सुनील गायकवाड,बालाजी कुंभार,सौदागर कुंभार, शिवाजी कुंभार आदीनी वनवास यात्राचे स्वागत केले.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी( दि.६ में) शक्तीपीठ तुळजापूर येथून पायी वनवास यात्रेचे प्रारंभ करण्यात आला असून श्री शिव राज्याभिषेक सोहळा दिनी(दि.६.जुन ) मुंबई मंत्रालयावर धडकणार आहे. यंदाचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा आझाद मैदानावर साजरा करण्यात येणार आहे.आरक्षणाचा विषय लवकर सुटणे आवश्यक आहे. त्यासाठी देहूरोड मधील नागरिक रस्त्यांवर येऊन मदत करू,असे बाळासाहेब जाधव यांनी सांगितले.




