मुंबई : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे. चंद्रपूरच्या जनतेशी एकरुप झालेलं नेतृत्व, धडाडीचे लोकप्रतिनिधी, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनानं जनतेशी घट्ट नाळ जुळलेलं तरुण नेतृत्व आपण गमावलं आहे. अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धानोरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे. चंद्रपूरच्या जनतेशी एकरुप झालेलं नेतृत्व, धडाडीचे लोकप्रतिनिधी, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनानं जनतेशी घट्ट नाळ जुळलेलं तरुण नेतृत्व आपण गमावलं आहे.… pic.twitter.com/Uz4aSdM4lV
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 30, 2023
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची, महाविकास आघाडीची मोठी हानी झाली आहे. दिवंगत बाळूभाऊ धानोरकर यांच्या कुटुंबियांच्या, सहकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो असे अजित पवारांनी भावना व्यक्त केल्या.



