लोणावळा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या, डॉक्टर सेलचे १७ व १८ जूनला लोणावळा येथील मेपल लॉनमध्ये राज्यस्तरीय निवासी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराप्रसंगी हरी नरके, महेश झगडे, सुभाष वारे, विकास लवांडे, अॅड. आसिम सरोदे, लोकमतचे संपादक संजय आवटे मार्गदर्शन करणार आहेत.
या शिबिराचे उद्घाटन १७ जूनला सकाळी ९.३० वाजता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार सुनील शेळके हे उपस्थित राहणार आहेत.
- शरद पवार यांची समारोपास उपस्थिती
१८ जूनला सायंकाळी निरोप समारंभासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी डॉ. राजेश शिंगणे, नीलेश लंके, अमोल मिटकरी, डॉ. किरण लामटे संवाद साधणार आहेत.




