पिंपरी (प्रतिनिधी) – निगडी परिसरात चार वाहने जळून खाक झाली. ही घटना शनिवारी (दि. १७) मध्यरात्री निगडीच्या सेक्टर क्रमांक २२मध्ये घडली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आग नेमकी कशामुळे लागली की वाहने पेटवण्यात आली याबाबतचा तपास निगडी पोलीस करत आहेत. या आगीत तीन रिक्षा आणि एक वाहन जळून खाक झाले आहे. आग लागल्याची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी येऊन आगीवर नियंत्रण मिळवलं, पण तोपर्यंत वाहने जळून खाक झाली होती. वाहन मालकांचे यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.




