नागपूर : डॉ. आशिषराव देशमुख यांचे भारतीय जनता पक्षात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. नागपुरात झालेल्या जाहीर सभेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत डॉ. आशिष देशमुख यांनी भाजपामध्ये घरवापसी केली.
राहुल गांधींनी ओबीसी समाजाचा अपमान केला आणि न्यायालयात माफी मागण्यास नकार दिला. त्यावेळी डॉ.आशिष देशमुख यांनी न्यायालयात भूमिका मांडली आणि त्याचवेळी आशिष देशमुख यांचा पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात समावेश करण्याचा निर्णय झाला.
डॉ. देशमुख यांच्याकडे नेतृत्वगुण आहेत. लोकांना सोबत घेऊन जाण्याची त्यांच्यात क्षमता आहे. भाजपाचे धोरण आणि कार्यपद्धती समजून आशिष पुन्हा एकदा भाजपामध्ये दाखल झाले आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरणार असून नागपूर जिल्हा हा भाजपाचाच असल्याचे सिद्ध करण्याची आता वेळ आली आहे.
गेल्या 11 महिन्यांत शेतकरी, महिला, युवक, उद्योग अशा सर्व घटकांसाठी युती सरकारद्वारे विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत. तसेच गेल्या 9 वर्षात मा. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशात अनेक विकासाची कामे झाली आहेत असे फडणवीस यांनी सांगितले.



