मुंबई- आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांनी पाटण्यात घेतलेल्या बैठकीवर जोरदार टीका केली. या बैठकीत सहभागी झालेल्या नेत्यांवर आरोप करत टीका केली,. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर घोटाळ्याचे आरोप करत टीका केली. पीएम मोदी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी पाटण्यात एक फोटो सेशन झाले होते. फोटोत असलेले सगळे लोक. या बैठकीत सहभागी झालेल्या पक्षांचा इतिहास पाहिला, तर सर्व एकत्र केले तर किमान २० हजार कोटींचे घोटाळे होण्याची खात्री आहे. एकट्या काँग्रेसने कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केले आहेत.
जर तुम्हाला गांधी परिवाराच्या मुला-मुलींचं कल्याण करायचंय तर काँग्रेसला मत द्या. शरद पवारांच्या मुलीचं कल्याण करायचंय, तर राष्ट्रवादी काँग्रेसला मत द्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसवर ७० कोटी रूपये घोटाळा असल्याचा आरोप असून त्यांचीही यादी मोठी असल्याचे मोदींनी म्हटले, यावर आता खासदार शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले, पंतप्रधान मोदींनी ज्या शिखर बँक घोटाळ्याचा आरोप केला त्या बँकेचा मी कधी सदस्यही नव्हतो. आजही नाही, त्या बँकेकडून मी कधीही कर्ज घेतलेले नाही. या बँके संदर्भात आरोप करणे किती बरोबर आहे, असंही शरद पवार म्हणाले. शिखर बँकेची यापूर्वीही चर्चा झालेली होती. ही बाब कोर्टात गेली होती. पण यात काही तथ्य नाही, असंही पवार म्हणाले.



