मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाने महाराष्ट्रात हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी बीआरएसने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती पंरतु मुंडे यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने आता आणखी एका बड्या नेत्याला गळ घालण्याचा प्रयत्न बीआरएसकडून करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
बीआरसकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. परंतु,पक्षप्रवेशाची ऑफर राजू शेट्टी यांनी नारकाली असल्याचे सांगण्यात येत आहे. याविषयी बोलताना,’गेल्या 4 महिन्यांपासून चंद्रशेखर राव हे आपल्या संपर्कात असल्याचेही राजू शेट्टी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.



