पिंपळे सौदागर : पिंपळे सौदागर परिसरातील यश संकुल सोसायटी मध्ये राहणाऱ्या भगिनी पुनम सचेत राठोड यांचा आज कोकणे चौक येथे अपघात झाल्याचे समजताच माजी नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते नाना काटे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. घटनस्थळी जात बघ्यांची गर्दी बाजुला सरकवत वाकड पोलीस स्टेशनचे कर्मचारी, वाहतुक पोलीस तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्या अपघातग्रस्त महिलेला त्वरित ऍम्ब्युलन्सची वाट न पाहता खाजगी वाहनाने दवाखान्यात दाखल केले.
अपघातामध्ये महिलेचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने प्रकृती अत्यंत नाजुक होती. सोसायटी चेअरमन, सेक्रेटरी यांना घटनेची माहिती देत संबंधित हॉस्पिटलला संपर्क केले असता अपघातग्रस्त महिलेचा उपचारापूर्वीच दुःखद निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. महिलेला वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न शेवट निरर्थक ठरल्याचे दुःख कायम मनात राहील. घडलेली घटना अतिशय दुःखद असुन माझ्या भगिनीच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रार्थना नाना काटे यांनी व्यक्त केली.




