पिंपळे सौदागर : आज सकाळी नागपूर वरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या खाजगी बसला झालेल्या अपघातात जवळपास २६ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली. यामध्ये पिंपळे सौदागर येथील श्रीमती शोभा वाणकर, वृषाली वाणकर, ओवी वाणकर या तीन नागरिकांचा समवेश आहे. पिंपळे सौदागर येथील काल झालेल्या भगिनीच्या अपघाती मृत्यू घटनेतून नागरिक बाहेर येत नाहीत तेच दुसऱ्या दिवशी तीन नागरिकांच्या अपघाती मृत्यूच्या घटनेने पिंपळे सौदागर दुःखाच्या छायेत आहे.

समृद्धी महामार्गावर बुलढाण्यातील सिंदखेडराजाजवळील पिंपळखुटा येथे अपघात झाला आहे. या अपघातात आपल्या रहाटणी पिंपळे सौदागर परिसरातील जवळचे सहकारी प्रणित वाणकर यांच्या मातोश्री श्रीमती शोभा वाणकर, पत्नी सौ.वृषाली वाणकर, मुलगी ओवी वाणकर यांचा त्याच बस अपघातात दुर्दैवी मृत्यु झाल्याचे समजले आणि मन सुन्न झाले अशा सहवेदना माजी नगरसेवक व विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी बोलताना व्यक्त केल्या.
https://maharashtramaza.online/?p=166627
काल एका भगिनीचे पिंपळे सौदागर येथे कोकणे चौकात अपघाती मृत्यूची घटना ताजी असतानाच आज दुसऱ्या दिवशी आपल्या पिंपळे सौदागर परिसरावर शोककळा पसरली आहे. समृद्धी महामार्गावरील अपघाताची बातमी पाहताना मनात विचार सुद्धा आला नाही कि माझ्या जवळच्या व्यक्तीपैकी कोणाच्यातरी कुटुंबातील व्यक्ती त्या अपघाताचा भाग असतील. मात्र, त्या अपघातातील आपल्या जवळच्या व्यक्ती असल्याचे समजल्यानंतर तातडीने प्रणित वाणकर यांना संपर्क करून घडलेल्या घटनेबद्दल श्रद्धांजली अर्पण करत आधार दिला. अपघात इतका भीषण होता कि मृतदेहाची ओळखही पटवणे अवघड आहे असे प्रणित यांनी माझ्याशी बोलताना सांगितले. माझा सहकारी प्रणित वाणकर यांच्या आयुष्यातून सर्वात जवळच्या व्यक्ती त्यांना सोडुन गेल्याने त्यांची कमी कधीच भरून न निघणारी आहे. त्यांच्या दुःखात आम्ही सर्व चिंचवडवासीय सहभागी आहोत असा नाना काटे यांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली. केला.




