पिंपरी : पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी ऑल आऊट ऑपरेशन राबवले. सोमवारी (दि. 10) रात्री दहा ते मंगळवारी (दि. 11) पहाटे दोन या कालावधीत शेकडो गुन्हेगारांची धरपकड पोलिसांनी केली. यामध्ये 71 पोलीस अधिकारी आणि 331 पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.
यामध्ये पोलिसांनी 728 संशयित वाहने चेक केली. पोलीस रेकॉर्डवरील 386 आरोपी चेक केले. मोटार व्हेईकल अॅक्ट प्रमाणे 143 वाहनांवर कारवाई करुन दंड वसूल केला आहे. हिस्ट्रीशिटर 27 आरोपी चेक केले. पाहिजे असलेले 17 आरोपी अटक केले आहेत. 167 संशयित इसम चेक केले. एन. बी. डब्ल्यु 10 वॉरंटची बजावणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र दारुबंदी कायद्याअंतर्गत पाच कारवाया करुन गुन्हे दाखल केलेले आहेत.
आर्म अॅक्ट प्रमाणे तीन कारवाया करून त्यात दोन तलवार, दोन लोखंडी कोयते, दोन सुरे जप्त केली आहेत. त्यात पाच आरोपींवर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चोरीचे व वाहन चोरीचे पाच गुन्हे उघड करुन पाच आरोपींना अटक करण्यात आली.
त्यांच्याकडून 102 रिक्षा, दोन मोटारसायकल, एक मोबाईल फोन, बिल्डींग मटेरियल साहित्य असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सीआरपीसी कलम 107 प्रमाणे चार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.




