बंगळूरु येथील अमृताहल्ली येथील एरोनिक्स मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या टेक कंपनीमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. एका माजी कर्मचाऱ्याने कंपनीचे एमडी आणि सीईओची हत्या केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी चार वाजता कंपनीचा माजी कर्मचारी फेलिक्स कार्यालयात दाखल झाला. त्याने कंपनीचे एमडी पी. सुब्रह्मण्य आणि सीईओ वीनू कुमार यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर तो तिथून फरार झाला.




