मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेऊन १० दिवस उलटून गेले. मात्र अद्याप खाते वाटप झालेले नाही. यावरून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर जोरदार टीका केली होती. याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते सुरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं.
सुरज चव्हाण म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांचा आम्लपित्तांचा त्रास वाढला आहे. त्यांना आम्लपित्तांच्या गोळ्यांची गरज आहे. तसेच स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यांना च्यवणप्राशची गरज आहे. कारण, याआधीची मंत्रिमंडळात शपथ घेतल्यानंतर खातेवाटपासाठी वेळ लागला होता. महाविकास आघाडीत देखील असंच काहीस झालं होतं. तेव्हा देखील दिल्लीत चर्चा व्हायची. आताही तेच होतय. मात्र आव्हाड यांची टीका केवळ राजकीय द्वेषातून असल्याचं चव्हाण यांनी नमूद केलं.



