पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व नेहरू विज्ञान केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या फिरत्या विज्ञान केंद्राचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले आहे.
भोसरी येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात या विज्ञान केंद्राचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, सायन्स पार्कचे संचालक प्रवीण तुपे याच्या हस्ते करण्यात आले.
फिरत्या विज्ञान पिंपरी चिंचवड शहरातील विविध संयोजन प्रयोगशाळी ही शालेय विद्यार्थ्यांना ४० शाळांमधून जाणार आहे. अल्हाट यांनी तर सूत्रसंचालन तर आभार शिक्षक सुनील पोटे यांनी केले.




