मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या गटातील १२ आमदारांना शरद पवार गटाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच आमदारांना उत्तर देण्यासाठी ४८ तासांचा अवधी देण्यात आला आहे.
शरद पवार यांनी ५ जुलै रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पक्षाची बैठक बोलावली होती. या बैठकीला मंत्रिपदाची शपथ घेतलेले ९ आमदार वगळून सर्व आमदारांना निमंत्रित करण्यात आले होते. परंतु त्याच दिवशी अजित पवार यांनीही वांद्रे येथील एमआयटी येथे बैठक बोलवली होती. त्यामुळे हे सर्व महाभारत राजकीय नाट्यात अडकले आहे.


