मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याचा प्रस्ताव शरद पवार यांना दिला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिली. तसंच शरद पवार यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध कसा राहिल याचा विचार करुन मार्गदर्शन करण्याची विनंती केली. यावर शरद पवारांनी कोणतंही भाष्य केलं नाही, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजी नंतर शरद पवार अजित पवार असे दोन गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात चलबिचल होताना दिसत असतानाच आज अचानक अजित पवार गटातील सर्व मंत्री व आमदारांनी थेट शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटर वरती जाऊन भेट घेतली. अजित पवार गटाकडून शरद पवार यांना एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला असला तरीही अद्याप शरद पवार यांच्याकडून कोणतेही प्रतिक्रिया दिले नसल्याचे जयंत पाटील यांनी माध्यम अशी बोलताना दिली.


