![]()
मुंबई परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक भागांत पाणी साचले आहे. रेल्वे मार्ग देखील पाण्याखाली गेल्याने पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या दहा महत्वाच्या रेल्वे गुरुवारी (दि. 20) रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. मुंबई मध्ये मंगळवार (दि. 18) पासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाने जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
मुंबईत मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. रेल्वे मार्ग पाण्यात गेल्याने उपनगरीय रेल्वे वाहतूक खोळंबली आहे.
मुंबई पाठोपाठ घाट परिसरात देखील मोठ्या स्वरुपात पाऊस पडत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या दहा रेल्वे गुरुवारी रद्द केल्या आहेत.




