
सलग तीन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ विजेतेपद पटकविणारे अप्पर पोलीस अधीक्षक पैलवान विजय चौधरी हे आगामी वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स स्पर्धेत कुस्ती खेळासाठी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धा 28 जुलै ते 06 ऑगस्ट या कालावधीत कॅनडा येथील विनिपेग या शहरात होणार आहेत.
चौधरी यांनी 2014,2015 आणि 2016 अशा सलग तीन वर्षामध्ये अतिशय प्रतिष्ठित अशा ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले होते. मूळचे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील सायगाव बगळीचे रहिवासी असलेले चौधरी हे सध्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखा पुणे विभागात येथे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
आगामी पोलीस खेळांमध्ये ते 125 किलो वजन गटात खेळणार असून, हिंद केसरी पैलवान रोहित पटेल यांच्याकडून ते कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहेत.



