
सप्तश्रृंगी गड घाटातील दरीतून राज्य परिवहन महामंडळाची अपघातग्रस्त बस सहा तासांच्या प्रयत्नांनतर बाहेर काढण्यास अखेर यश मिळाले आहे. दरम्यान नांदुरी – सप्तशृंगी गड दरम्यान वाहतूकीसाठी बंद केलेला मार्ग खुला करण्यात आला आहे.
आद्यस्वंयभू शक्तीपीठ असलेल्या सप्तश्रृंग गडाच्या घाट रस्त्यावरील गणेश टप्पा भागात १२ जुलै राेजी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान राज्य परिवहन महामंडळाची सप्तशृंगी गड – खामगांव ही मुक्कामी बस दाट धुक्यात बस चालकाला रस्त्यावरील वळणाचा अंदाज न आल्याने सरळ घाटाचे सरंक्षक कठडे तोडून सुमारे ४०० फुट दरीत कोसळली होती.
यात एका महिला भाविकांचा मृत्यु तर बस चालक, वाहकासह २२ भाविक जखमी झाले होते. दरम्यान दरीत कोसळलेली बस बाहेर काढण्यासाठी पाच दिवसांपूर्वी अयशस्वी प्रयत्न झाल्यानंतर आज बुधवार, ता. १९ रोजी खबरदारीचा उपाय तसेच सुरक्षीतेच्या दृष्टीने व वाहतूकीस अडथळा येणार होण्याची शक्यता गृहीत धरुन राज्य परिवहन महामंडळाने केलेल्या मागणीनूसार नांदुरी ते सप्तशृंगी गड रस्ता सहाय्यक जिल्हाधिकारी यांचे आदेशाने सकाळी १० वाजेनंतर बंद करण्यात आला होता.



