लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर रविवारी (दि. 23) रात्री आडोशी गावचे हद्दीत दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. दरडीचा रस्त्यावर आलेला राडारोडा बाजूला केल्यावर साधारण 4.30 तासाच्या खोळंब्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.
रायगड जिल्ह्यातील आडोशी गावचे हद्दीत किमी 41 जवळ मुंबई लाईनवर रात्री 10.35 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळून दगड व माती एक्सप्रेस हायवेच्या मुंबई बाजूच्या तिन्ही लेनवर आल्याने मुंबई लेनवरील वाहतूक थांबविण्यात आली होती. सुदैवाने या घडतनेत कोणत्याही प्रकारची हानी किंवा नुकसान झाले नाही. पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरील सर्व माती व राडारोडा बाजुला केल्यानंतर सदरच्या तीनही लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या.
लोणावळा व रायगड जिल्ह्यातील बोर घाट परिसरात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे डोंगर भागात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या छोट्यामोठ्या घटना घडत आहेत. त्यादृष्टीने प्रशासनाने अलर्ट जारी केला असून बचाव शक आणि संगत आहेत.



