पुणे : पुणे-मुंबई दरम्यानची रेल्वेसेवा बुधवारी सकाळी विस्कळीत झाली. मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने ती दीड तास लोहमार्गावर अडकून पडली होती. या काळात पुणे-मुंबई दरम्यानच्या काही गाड्यांना विलंब झाल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसला.
मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मालगाडीचे इंजिन शेलारवाडी नजीक सकाळी ९ वाजून १८ मिनिटांनी बंद पडले. यामुळे मालगाडी लोहमार्गाव एकाच जागी अडकून पडली. अकेर घोरपडी यार्डातून दुसरे इंजिन आणून मालगाडीला जोडण्यात आले. त्यानंतर सकाळी १०.५३ वाजता मालगाडी पुढे मार्गस्थ झाली. या सुमारे दीड तासांच्या कालावधीत पुणे-मुंबई दरम्यानच्या गाड्यांना विलंब झाला.



