
कामशेत : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर पुन्हा एकदा दरड कोसळल्याचं वृत्त आहे. मुंबईच्या बाजूला जाणाऱ्या कामशेत बोगद्याच्या तोंडाजवळ ही दरड कोसळली. यामुळं या मार्गावरील वाहतूकीवर परिणाम झाला आहे. रात्री साडे आठच्या सुमारास ही दरड कोसळ्याची माहिती मिळते आहे.
एका लेनमध्ये दरडीचा राडारोडा आल्यानं मुंबईकडं जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला. पण दुसरी लेन सुरु असल्यानं वाहतूक हळुवारपणे सुरु आहे. महामार्ग पोलिसांचं आयआरबीच्या मदतीनं या दरडीचा राडारोडा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती १० वाजेपर्यंत सुत्रांच्या हवाल्यानं मिळाली आहे.




