पिंपरी : पिपंळे सौदागर येथील कुणाल आयकॅान रोडवरील शिवार चौक ते छत्रपती युवा चौक पर्यंत रस्त्याचे अद्ययावत पध्दतीने विकास करण्यात येणार आहे. त्याचे काम लवकरच चालु करण्यात येणार असल्याने त्याबाबत आज संबंधीत पालिका स्थापत्य प्रकल्प अधिकारी व सल्लागार कंपनी यांच्या सोबत माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक नाना काटे यांच्या समवेत एक बैठक घेण्यात आली. या कामामध्ये पुर्वी असलेल्या संपुर्ण ड्रेनेज लाईन, स्ट्रॅाम वॅाटर लाईन नविन टाकण्यात येणार आहे अशी माहिती समोर आली आहे.
या कामासाठी १ ते १.५ वर्षांचा कालावधी लागणार आहे. या रस्त्यावर वाहनाची व नागरिकांची वर्दळ जास्त असल्याने या रस्त्याचे काम दोन टप्यात करण्यात येणार असुन नागरिकांना याचा त्रास होऊ नये म्हणुन वाहतुकीसाठी नविन तात्पुरते स्वरूपात पर्याय देखील उपल्बध करून देण्यात येतील. या कामासंदर्भात नागरिकांच्या खुप तक्रारी येत असुन लवकरात लवकर या कामाचे टेंडर काढुन काम पुर्ण करावे अशा सुचना अधिकाऱ्यांना यावेळी केल्या.
या बैठकी दरम्यान संबधित रस्त्याचे स्थापत्य प्रकल्प विभागाचे अधिकारी कार्यकारी अभियंता श्रीमती संध्या वाघ, उपअभियंता संजय काशीद, इन्फ्रा कंन्सलटंट कंपीनीचे सल्लागार लक्ष्मीकांत पतंगे, रणजीत कोल्हे व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
.




