मुंबई: समृद्धी महामार्गावर दुर्घटनेचे सत्र सुरुच आहे. ठाणे जिल्ह्यात शहापूर इथे मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या अपघातात १६ कामगार ठाऱ झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तीन जण यामध्ये जखमी झाले असून ठिगाऱ्याखाली आणखी कामगार अडकले असण्याची भिती व्यक्त होत आहे.
#UPDATE | Maharashtra: Two NDRF teams are working at the site after a crane fell on the slab of a bridge in Shahapur tehsil of Thane district. Till now 14 dead bodies have been retrieved and 3 have been injured. Another six are feared to be trapped inside the collapsed… https://t.co/3QiIuUwoIP pic.twitter.com/tptIFDfAfb
— ANI (@ANI) August 1, 2023
NDRF च्या दोन टीम घटनास्थळी पोहचल्या असून मदतकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. घटनास्थळी मंत्री दादा भूसे यांनी घटनास्थळी पोहचत आढावा घेतला असून दुर्घटनेची चौकशी केली जाणार असल्याच स्पष्ट केलं आहे. तसंच मृत कामगारांच्या कुटुबियांना मदत केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.



