
पिंपरी :- पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्या वतीने अधिक मास पुरुषोत्तम पर्वकाळ निमित्त अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री एकनाथी गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, यातील पहिले पुष्प ह.भ.प. उल्हास महाराज सूर्यवंशी यांनी गुंफले. तर शिवव्याख्याते डॉ. गजानन महाराज वाव्हळ यांचे व्याख्यान संपन्न झाले.
पहिल्याच दिवशी पिंपळे गुरवकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी महामंडलेश्वर लहवितकर महाराज, वृक्षमित्र अरुण पवार, आयोजक विजूअण्णा जगताप, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, उद्योजक विजय जगताप, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, नितीन कदम, तुषार तरस, किसन नेटके, रमेश पाटील, संजय भिसे, कुंदाताई भिसे, सुरेश काटे, सूर्यकांत गोफणे, अजय दुधभाते, राहुल बालवडकर यांच्यासह पिंपळे गुरव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहिले पुष्प गुंफताना ह.भ.प. उल्हास महाराज सूर्यवंशी अधिक मास का साजरा करतात, याविषयी विवेचन केले. नामसाधनेला मानवी जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. भगवान परमात्म्याचे नामस्मरण करावे. रामनामाचं माहात्म्य त्यांनी आपल्या कीर्तनातून सांगितले.
डॉ. गजानन वाव्हळ यांनी आपल्या व्याख्यानात जीवनातील आहाराचे महत्त्व सांगितले. पूर्वीच्या काळी सकस आहार घेऊन लोक तंदुरुस्त होते. आज फास्टफूडमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचेही त्यांनी सांगितले.




