![]()
नुकतेचं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तीने पुण्यात येऊन गेले. त्यांनी यावेळी पुणे मेट्रोच्या फेस-१ चे उद्घाटनही केले. मोदींनंतर अमित शाह देखील पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येऊन गेले. त्यानंतर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री सहकारमंत्री अमित शाह पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. अमित शहा केंद्रीय सहकार संस्थेने निर्माण केलेलं पोर्टल लॉंच करणार आहेत. हा कार्यक्रम चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात पार पडणार आहे.
हा कार्यक्रम ६ ऑगस्टला दुपारी १२ वाजता पार पडेल. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री उपस्थित राहणार आहेत.




