
आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ही बैठक बोलावली होती. यावेळी महाविकास आघाडी एकत्र लढणार, पुन्हा वज्रमुठ सभा होणार, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमधील नेते या बैठकीला उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचा निर्धार मविआ नेत्यांनी बैठकीत केला.
बाळासाहेब थोरात म्हणाले, आम्ही तिन्ही मित्र पक्ष एकत्र आहोत. एकत्र लढणार आहोत. लोक आमच्याबरोबर आहेत. आम्ही विभागवार बैठका घेणार आहोत. तसेल लवकरच वज्रमुठ सभा देखील सुरू होतील.


