GST कौन्सिलच्या 51 व्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माध्यमांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेत अर्थमंत्र्यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. ऑनलाइन गेमिंग आणि हॉर्स रेसिंगवरील 28% जीएसटीचा पुढील सहा महिन्यांत आढावा घेतला जाईल, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रामुख्याने ऑनलाइन गेमिंग, हॉर्स रेसिंग आणि कॅसिनोवरील 28 टक्के जीएसटीवर चर्चा करण्यात आली. मागील बैठकीत ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याला सातत्याने विरोध होत होता.
मात्र आजच्या बैठकीत ऑनलाइन गेमिंगचे दर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. GST कौन्सिलच्या 51 व्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माध्यमांशी संवाद साधला.



