पिंपरी दि. ०५ ऑगस्ट :- पुणे जिल्हयाच्या हद्दीतून एक वर्षे कालावधीकरीता आरोपीला पोलिसांनी तडीपार केले आहे. तरीही बेकायदेशीरपणे आरोपी हा शहरात आला. त्याने अवैधरित्या स्वतः जवळ विनापरवाना लोखंडी कोयता बाळगला.
(दि. ३) रोजी रात्री ७.४५ च्या सुमारास पोलिसांच्या गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकाने आरोपीला रेल विहार सोसायटी जवळ, बिजलीनगर, चिंचवड येथून ताब्यात घेतले. सुनिल मारुती लोणी (वय २२ वर्षे रा. नलावडे वस्ती, रेल विहार शेजारी, बिजलीनगर, चिंचवड) असे अटक आरोपीचे नाव आहे.
चिंचवड पोलिसांनी ३६८/२०२३ आर्म अॅक्ट ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४२, ३७ (१) (३) सह १३५ नुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. सपोफा जगताप हे पुढील घटनेचा पुढील तपास करीत आहेत.




