पिंपरी : महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळावी, या उद्देशाने एकदिवस येते. दप्तरविना असा उपक्रम ११० प्राथमिक शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.
दररोज दप्तर आणि अभ्यासाचे ओझे विद्यार्थ्यांना कंटाळवाणे होऊ शकते. अशा परिस्थितीत एखादा दिवस विरंगुळ्याचा असला तर नक्कीच उत्साह निर्माण होतो. जुलैपासून हा उपक्रम प्रत्यक्ष सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना कार्यानुभव, चित्रकला, क्रीडा, शारीरिक शिक्षण, कविता, संगीत, मातीकाम या दिवशी घेण्यात
विद्यार्थ्यांचे सुप्तगुण वाढीला लागतात. तसेच शालेय वयापासून विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षणाची सुरुवात होते. हसत- खेळत ताणविरहित शिक्षण घेणे शक्य होईल. कला कौशल्यांकडे सध्याच्या काळात दुर्लक्ष केले जाते. मात्र, व्यक्तिमत्त्व विकासात या विषयांना मोठे महत्त्व आहे. त्याचा एकंदर जडणघडणीवर परिणाम होतो. याच विचाराने दप्तरविरहीत उपक्रमाला चांगला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे.




