पिंपळे सौदागर : राष्ट्रवादी कॉंग्रेस असंघटीत कामगार संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा श्रीमती मिनाताई मोहिते यांच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त महानगरपालिका क्षेत्रातील पिंपळे सौदागर भागातील सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान आयोजित केला होता. यावेळी नाना काटे यांच्या हस्ते सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला. या सन्मानप्रसंगी कामगारांच्या वतीने केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी नगरसेविका सौ. शितल विठ्ठल उर्फ नाना काटे, युवानेते शामभाऊ जगताप, प्रशांत सपकाळ,संघटनेचे अरबाज खान,भीम थापा, नितीन गायकवाड, भूषण सपकाळ, तुकाराम कांबळे , शिवशंभु सेवा मंडळ व ग्रामस्थ नागरिक व सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.




