पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्गावरील वाहतूक कोंडीवर तत्काळ उपाययोजना कराव्यात. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात प्रस्तावित मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या कामाला गती देतानाच शिवाजीनगर- हिंजवडी- माण मेट्रोच्या कामाचा वेग वाढवावा, असे निर्देश आयोजित बैठकीत दिले. यावेळी या प्रकल्पांतर्गत सुरू असलेले पाईलिंग, कास्टिंग आदी कामाचा आणि समस्यांचा आढावा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतला.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीनं उभारण्यात येत असलेल्या या मेट्रोच्या कामाला गती देण्याच्या दृष्टीनं प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय जागा, खासगी जागांबाबत सर्व यंत्रणांनी समन्वयानं आणि गतीनं काम करावं. नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी महानगरपालिका तसंच वाहतूक पोलिसांनी समन्वयानं वाहतुकीचं नियोजन करावं असं पवार यांनी म्हटले आहे.
गणेश खिंड रॅम्पसाठी आवश्यक ४५ मीटर रुंद रस्त्याच्या जागेचा ताबा (आरओडब्ल्यू) सर्व कार्यवाही करून १५ सप्टेंबरपर्यंत देण्यात यावा. यासाठी पुणे महानगरपालिकेनं आवश्यक कार्यवाही करावी. औंध, बाणेर, पाषाण, गणेश खिंड रॅम्प येथील बॅरिकेडिंग करणं, आवश्यक तिथे वाहतूक वळवणं आदी कामं नागरिकांच्या सुविधा लक्षात घेऊन करावेत, असेही निर्देश दिले आहेत.




