सलगच्या सुट्ट्या असल्यानं मुंबईकर मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. परिणामी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर याचा ताण आला आहे.

वाहनांच्या वाढलेल्या संख्येने बोरघाटात मार्ग मंदावला आहे. अमृतांजन पुलाजवळ वाहनं कासवगतीने पुढे सरकत आहेत. कोणाला पर्यटनस्थळी तर कोणाला आपापल्या गावाला पोहोचायचं आहे. पण तत्पूर्वी या वाहतूक कोंडीचा सामना करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे
परिणामी अधिकचा वेळ खर्ची घालावा लागत आहे. दरम्यान पुण्यावरुन मुंबईला जाणारी मार्गिका काही वेळासाठी बंद करण्यात आली होती. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांकडून वाहनं वळवण्यात आली



