
माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांचा अंतरिम जामीन दिला आहे. जामीन मिळाल्यानंतर आज अखेर ते क्रिटी केअर रुग्णालयातून बाहेर पडले. नवाब मलिक यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे अनेक नेते आणि कार्यकर्ते जमा झाले होते. कार्यकर्त्यांनी नवाब मलिकांचं जंगी स्वागत केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना आरोग्याच्या कारणास्तव दोन महिन्यांचा अंतरिम जामीन दिला आहे.
तीन दिवसांपूर्वी जामीन मंजूर
पीएमएलए केसमध्ये सुप्रीम कोर्टानं त्यांना तीन दिवसांपूर्वी जामीन मंजूर केला होता. पण शनिवार-रविवार दोन दिवस सुट्टी असल्यानं त्यांची आज सुटका झाली. जामिनाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना सीटी केअर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.



